घुमडे गावात भाजपा महायुतीला प्रचारात उत्स्फूर्त पाठींबा ; नारायण राणे यांना विक्रमी मताधिक्य देणार
मालवण : भाजपा महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ घुमडे गावात माजी सरपंच दिलीप बिरमोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामदैवत श्री घुमडाई देवीच्या चरणी श्रीफळ ठेऊन करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घुमडे गावातून राणे साहेबांना नेहमीच मोठे मताधिक्य मिळत असून यावेळी देखील विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी भाऊ सामंत, सरपंच स्नेहल बिरमोळे, उपसरपंच राजु सावंत, युवक उपाध्यक्ष राकेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य सुबराव राणे, चंदा वस्त, सौ. जाधव, सौ. टेंबूलकर, विष्णु बिरमोळे, सौ. साळसकर, नियार टेंबूलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.