आडवली – मालडी जि. प. विभागात दत्ता सामंतांचा धडाका सुरूच ; श्रावण सडेवाडीत उबाठाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
श्रावण घाडी दळवीवाडी, पुजारेवाडी, परबवाडी, तळेवाडी येथील ग्रामस्थांचा महायुती उमेदवार नारायण राणे यांना एकमुखी पाठींबा
मालवण | कुणाल मांजरेकर
भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी मालवण तालुक्यातील आडवली मालडी जि. प. विभागात महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा धडाका कायम ठेवला आहे. या विभागात उबाठाला ठिकठिकाणी सुरुंग लावल्यानंतर शुक्रवारी श्रावण सडेवाडी मध्ये दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत उबाठाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर श्रावण घाडी दळवीवाडी, पुजारेवाडी, परबवाडी, तळेवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या गावाचा शाश्वत विकास डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एकमुखी पाठींबा जाहीर केला.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढून गावातून भाजपाला अपेक्षित असलेले मताधिक्य देवून विभागात श्रावण एक नंबरचा बुथ असेल असा निर्धार बुथ अध्यक्ष शिवराम परब, माजी सरपंच प्रशात परब, मंगेश यादव, आकाश परब, भाऊ राऊत, स्वप्निल कोळंबेकर, दिपक पाटकर तसेच श्रावण गावातील आजी माजी पदाधिकारी तसेच बहुसंख्य महिला वर्ग यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी बाळू कुबल, युवा उद्योजक विनायक बाईत, शक्तीकेंद्र प्रमुख निलेश बाईत, माजी सरपंच प्रशांत परब, मंगेश यादव, आकाश परब, भाऊ राऊत, राजेश तांबे, राजन वराडकर, जॉन नरोन्हा तसेच राजू राणे, रसिका मालप, रामदास पवार, ग्रा. पं. सदस्य शालिनी पवार, संतोष परब, चंद्रशेखर परब, माजी ग्रा. पं. सदस्य स्वप्नाली परब, ग्रा. पं. सदस्य सुहासिनी परब, शोभा चिंदरकर, शंकर धुरी, महेश दळवी, आकाश परब, मंगेश दळवी, भाऊ राऊत, संदीप परब, आश्विनी परब, रत्नप्रभा दळवी, मनस्वी दळवी, धनश्री दळवी, मनस्वी राऊत, स्वप्नील कोळंबेकर, विनायक घाडी, दीपक घाडी, सुलोचना घाडी आदी उपस्थित होते.