केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या प्रचाराला देवली खालची काळेथरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

ना. राणे यांना गावातून ७५ ते ८० टक्के मतदान देणार ; भाजपा महायुती पदाधिकाऱ्यांचा विश्वास

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गावागावातून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील  देवली खालची काळेथर बूथ क्र. ११७ मध्ये ना. राणेंच्या घरोघरी प्रचारा दरम्यान ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावातील ७५ ते ८० टक्के मतदान ना. राणे यांना मिळेल, असा विश्वास गावातील स्थानिक भाजपा महायुती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

या प्रचारफेरी दरम्यान विजय चव्हाण, गुरुप्रसाद चव्हाण, गुरुनाथ चव्हाण, रामचंद्र चव्हाण, शिवदास चव्हाण, समीर वेतुरेकर, अक्षय चव्हाण, राहुल चव्हाण, मनीष पाटकर, कमलाकर पाटकर,  राजू चव्हाण, वैभव चव्हाण, भाई चव्हाण, योगेश चव्हाण, शैलेश चव्हाण, गणेश करंगुटकर, बंटी चव्हाण, संदेश वेतुरेकर, रुपेश गणेश, गणेश चव्हाण यांच्यासह भाजपा महायुतीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!