कोईलचे उबाठा शाखाप्रमुख महेश साटम यांचा भाजपात प्रवेश
![](https://i0.wp.com/kokanmirror.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240504-WA0014.jpg?fit=988%2C574&ssl=1)
मालवण : मालवण तालुक्या तील कोईल गावातील शिवसेना ठाकरे गट शाखाप्रमुख महेश साटम यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला. यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, आचरा सरपंच जेरोन फर्नाडीस, संतोष गावकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, पिंट्या पांगे, राजन पांगे, प्रशांत गावकर, संजय लोके, अमित गावकर आदी उपस्थित होते.