पास्कोल रॉड्रिक्स यांनी घेतला “यु टर्न” ; मनसेतच कायम राहणार

मनसे नेत्यांची भेट घेतल्यानंतर घेतला निर्णय ; अमित इब्रामपूरकर यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

दोनच दिवसांपूर्वी मनसेचा राजीनामा देऊन माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या भूमिकेला पाठींबा जाहीर करणाऱ्या मनसे तालुका उपाध्यक्ष पास्कोल रॉड्रिक्स यांनी आपल्या निर्णयापासून यु टर्न घेतला आहे. मनसेचे सिंधुदुर्ग पक्षनिरीक्षक संदीप दळवी, गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे नेते अविनाश जाधव यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर श्री. रॉड्रिक्स यांनी मनसेतच सक्रिय राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मनसेच्या अमित इब्रामपूरकर यानी दिली आहे.

यावेळी मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा पक्षनिरीक्षक संदीप दळवी, गजानन राणे, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज जाधव, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, मालवण तालुका संपर्कप्रमुख राजू साटम, अमित इब्रामपूरकर, सागर जाधव, अभिजीत मेथर उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!