खोटले गावातील उबाठाचे उपसरपंच व ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश ; निलेश राणेंची उपस्थिती
भाजपा महायुती विकासाचा बॅकलॉग भरून काढणार : निलेश राणे यांची ग्वाही
मालवण : मागील दहा वर्षात विकासाच्या बाबतीत सिंधुदुर्ग मागे राहिला. येथील आमदार, खासदार यांचा अपयशी आणि निष्क्रिय कारभार याला जबाबदार आहे. मात्र भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाचा बॅकलॉग भरून काढत असताना प्रत्येक गावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा महायुती कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन भाजपा नेते निलेश राणे यांनी खोटले येथे बोलताना केले.
दरम्यान, खोटले गावातील जनतेच्या ज्या ज्या विकासात्मक मागण्या असतील त्या पूर्ण केल्या जातील. आम्ही सर्व ग्रामस्थ्यांसोबत आहोत. अशी ग्वाही निलेश राणे यांनी ग्रामस्थांना दिली.
ठाकरे गटाचे खोटले ग्रामपंचायत उपसरपंच मानसी महेश चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी महेश सत्यवान चव्हाण, जान्हवी चव्हाण, विलास कदम, अविनाश कदम, यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, गाव प्रमुख प्रभाकर परब, भाजपा बूथ अध्यक्ष अमित ठाकूर, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश राणे, शक्ती केंद्रप्रमुख विनायक परब, विजय निकम, यासीन सय्यद, रवी कदम, भाऊ परब, ग्रामपंचायत सदस्य सहदेव मोडक, रणजित परब, तसेच गिरीधर मोडक, अनंत परब, ज्ञानदेव परब, अनंत सावंत, विश्वनाथ परब, विजय घाडीगावकर, शुभांगी साळकर, अर्चना परब, विनया जाधव, शुभांगी परब, अंजली मोडक, अलका मोडक, प्रेमलता मोडक, भक्ती सुद्रीक यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
विनायक राऊत यांच्याकडून दत्तक गावाचाही विकास नाही
विनायक राऊतने दत्तक घेतलेल्या शिवापूर गावात कोणताही विकास केला नाही. गावात कोणत्याही रोजगाराच्या संधी नसल्याने येथील तरुण गाव सोडून बाहेर जात आहे. याला ठाकरे गटाचा दहा वर्षाचा अपयशी खासदार, आमदार जबाबदार आहे. त्यामुळे आता लोकांनीच राणे साहेबांच्या विजयाचा निर्धार केला असून सर्वांगीण विकासासाठी जनता भाजपा सोबत येत आहे असे निलेश राणे यांनी सांगितले.
उपसरपंच यांनी गावच्या अधिकाधिक विकासासाठी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या गावविकासाच्या दृष्टिकोनाचा आदर ठेवत हेदूळ गावात जास्तीत जास्त विकासनिधी केंद्रीय मंत्री राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही प्रयत्नाशील असल्याचे निलेश राणे यांनी सांगत प्रवेशकर्ते यांचे भाजप पक्षात स्वागत केले. यावेळी ग्रामस्थानी विकासकामांबाबत निवेदन निलेश राणे यांना दिले.
सिंधुदुर्गच्या विकासासाठी राणेसाहेबच हवेत !
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट राणे साहेबांनी केला. मात्र गेल्या दहा वर्षात स्थानिक आमदार, खासदार काहीच करू शकले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी इथे राणे साहेब तर देशात मोदी सरकारचं येईल. असा विश्वास ग्रामस्थ रवी कदम व अन्य ग्रामस्थांनी व्यक्त केला.