धुरीवाडा प्रभागात यतीन खोत यांच्या नेतृत्वाखाली खा. विनायक राऊत यांच्या प्रचाराचा झंझावात

इंडिया आघाडीचे उमेदवार खा. राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन विजयाची हॅट्ट्रिक करतील : माजी बांधकाम सभापती यतीन खोत

मालवण : लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या प्रचारा निमित्ताने मालवण शहरातील धुरीवाडा प्रभागात माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या नेतृत्वाखाली भगवा झंझावात पाहायला मिळत आहे. या मतदार संघातून खा. राऊत पुन्हा एकदा मोठे मताधिक्य मिळवत विजयाची हॅट्रिक करतील, असा विश्वास यतीन खोत यांनी व्यक्त केला आहे.

आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात मालवण कुडाळ मतदार संघात पदाधिकारी कार्यकर्ते जोरदार प्रचार करत आहेत. मालवण शहर धुरीवाडा प्रभागात मोठ्या संख्येने पदाधिकारी व स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत यतीन खोत यांच्या माध्यमातून खा. विनायक राऊत यांचा प्रचार केला जात आहे. जनतेचा मिळत असलेला पाठिंबा लक्षात घेता जनतेने पुन्हा एकदा खासदार विनायक राऊत यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे. असा विश्वास यतीन खोत यांनी व्यक्त केला.

यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी शहर प्रमुख बाबी जोगी, बाळू अंधारी, महेश जावकर, दीपा शिंदे, नंदा सारंग, रश्मी परुळेकर, आकांक्षा शिरपुटे, वासुदेव गावकर, हनुमंत तोंडवळकर, युवासेना मालवण प्रमुख मंदार ओरसकर, महेश मयेकर, संतोष सावंत, काशिनाथ मांजरेकर, किशोर मयेकर, राजा वस्त, महेश देसाई, महेश मेस्त्री, विनोद परब, आशिष परब, निखिल शिंदे, जेम्स फर्नांडिस, बाबा लुईस, सरदार ताजर, मांजरेकर सर, प्रमिला मयेकर, हर्षदा मयेकर, निकिता महापणकर, वस्त काकी, तृप्ती कांबळी, शांती तोंडवळकर, शोभना चिंदरकर, जयश्री शेडगे, कडू काकी, दादा पाटकर, राजू घोलपकर, संजीव बिडये, सरमळकर, दिलीप पवार, अनिल मयेकर, कमलाकर खोत, सदा सावंत, अभि विलये, शांती बांदेकर, उमेश परब, संजय कांदळकर यांसह अन्य नागरिक सहकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!