वायरी भुतनाथ गावात उबाठाला धक्का ; माजी उपसरपंच शाम झाड यांचा भाजपात प्रवेश
दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश : केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृवावर विश्वास ठेवत भाजपात दाखल होत असल्याचे केले स्पष्ट
मालवण : वायरी भुतनाथ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा रामेश्वर मच्छिमार सोसायटीचे माजी उपाध्यक्ष, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शाम झाड यांनी भाजपाचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत सहकारी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृवावर विश्वास ठेवत गावच्या अधिकाधिक विकासासाठी भाजपात प्रवेश केल्याचे शाम झाड यांनी सांगितले.
यावेळी भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, भाजपा जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्षा अशोक तोडणकर, आनंद गांवकर, मच्छिमार सेल जिल्हा संयोजक विकी तोरसकर, उद्योजक मिलिंद झाड, युवा उद्योजक केदार झाड, ग्रापं सदस्य पांडुरंग मायानक, प्रतीक्षा केळूसकर, देवानंद लोकेगावकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, अरुण तळगांवकर, गणेश सातार्डेकर, मकरंद चोपडेकर, संदेश तळगांवकर, चंदन नाईक, बाबल गोसावी, हर्षद हळदणकर, बबन गांवकर, काना माडये, दादा वेंगुर्लेकर, हर्षद हळदणकर, बबन गांवकर, टेंबूलकर, जिवन मसुरकर, भाई मांजरेकर, अरुण तोडणकर, नितीन तोडणकर, विकी लोकेगावकर, भाऊ मोर्जे यांसह पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.