राठिवडे गावात उबाठाला धक्का ; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
राणेसाहेबांच्या माध्यमातून गावात रोजगाराभिमुख प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार : दत्ता सामंत यांची ग्वाही
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण तालुक्यात उबाठाला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. मालवण तालुक्यातील राठिवडे गावातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते मुकेश धुरी, संतोष धुरी, प्रकाश खांबल यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सैनिकांनी मंगळवारी रात्री दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला.
राठिवडे मधील कृष्णविलास हॉल मध्ये पार पडलेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्याला भाजपाचे स्थानिक नेते बाळू कुबल, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजा गावडे, माजी उपसभापती अरुण मेस्त्री, विनायक बाईत, अमित गावडे, डॉ. श्याम धुरी, राजेश तांबे, निलेश बाईत, प्रशांत परब, मंगेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर व भाजपचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते मुकेश धुरी, संतोष धुरी, प्रकाश खांबल यांच्यासह रघुवीर धुरी, मोहन धुरी, दिगंबर धुरी, देवानंद धुरी, सुरेश पवार, हर्षल मेस्त्री, यशवंत धुरी, केशव धुरी, जिवबा धुरी, रमेश पवार, अनिरुद्ध धुरी, शिवाजी पवार, आनंद धुरी, सारिका धुरी, सीमितीनी गावडे, प्रिया धुरी, सानिका धुरी, सुनंदा धुरी, मंदा तावडे, यशोदा धुरी, भूषण धुरी, बाबू तावडे, मनोहर शेट्ये, सावली धुरी, अनिकेत खांबल, तेजस्विनी धुरी, पांडुरंग धुरी, विजय धुरी आदींन भाजपात प्रवेश केला.
यावेळी बाळू कुबल यांनी हा विभाग 1990 पासून नारायण राणे यांचा बालेकिल्ला असून राणे साहेबांसारखा द्रष्टा नेता लोकसभेत जाणे आवश्यक असून विकासाचे प्रश्न सोडवण्याची ताकद त्यांच्यात असल्याचे सांगितले. मागील दहा वर्षात येथील बेरोजगारी दूर करण्यासाठी एकही प्रकल्प विद्यमान खासदारांनी आणला नाही, असे सांगून राणे साहेब तुमच्या सोबत आहेतच. पण दत्ता सामंत यांच्या सारखा नेता तुमच्या साठी सदैव उपलब्ध असल्याचे सांगितले.
यावेळी दत्ता सामंत यांनी विनायक बाईत, निलेश बाईत, प्रशांत परब यांचे कौतुक केले. या गावातील रस्ते राणेसाहेबांच्या माध्यमातून झाले आहेत. कुडाळ मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात उबाठा मधून भाजपात पक्ष प्रवेश होत असून राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाने येथील जनता भाजपाकडे आकर्षित होत आहे. कॅलेंडर आणी खडी साखर.देण्या व्यतिरिक्त एकही काम येथील स्थानिक आमदार, खासदारांनी काहीच काम केले नाही, असे सांगून निवडणुकीनंतर या गावातील युवकांना रोजगार देण्यासाठी एखादा प्रकल्प राणे साहेबांच्या माध्यमातून गावात आणूया, असे आवाहन दत्ता सामंत यांनी केले.