रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून राणेसाहेब मोठ्या मताधिक्याने विजयी होतील 

भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांचा विश्वास ; गवंडी वाडा बूथ क्र. ९५ मध्ये घरोघर प्रचाराचा शुभारंभ

मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील महायुतीतील सर्वच पक्षांनी गावागावात प्रचाराचा धडाका सुरू ठेवला असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सारख्या नेतृत्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य जनतेतून मिळणारा प्रतिसाद पाहता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री राणेसाहेब सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी व्यक्त केला आहे.

मालवण शहरातील गवंडीवाडा येथील श्री राम मंदिर येथे श्रीफळ अर्पण करून बूथ क्रमांक ९५ मध्ये घरोघरी प्रचाराचे शुभारंभ करण्यात आला. सर्वच ठिकाणी जनता राणेसाहेबांना साथ देणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहेत. महायुतीचे सर्व पक्षांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील प्रचाराला जोर देत आहेत. यावेळी मतदारसंघातील प्रचारदरम्यान भेटी होत असताना केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील उमेदवार नारायण राणे यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. 

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, शहर सरचिटणीस निशय पालेकर, माजी नगरसेविका शर्वरी पाटकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, बूथ प्रमुख दादा कोचरेकर, चित्रा हरमळकर, आरती कोडवाडकर,अनिशा कवटणकर, राजन परुळेकर, सर्वेश येमकर, तन्मय पराडकर, अरुण जाधव, परेश वाघ, विलसन परेरा, तुषार खराडे, सागर पाटकर, आदेश कोचरेकर, समीर मुंबरकर, राजू कुबल, चेतन हरमळकर, विनय हरमळकर, बबन गांवकर, राजू मोरजकर, जीवन घुमाळ, चारुदत्त हिंदळेकर, प्रशांत गवंडी, अंजली गवंडी, दिशा पाटकर, गायत्री गवंडी, चित्रा वस्त, प्रसाद गवंडी, वेदा पाटकर,  राजा पराडकर, दिवाकर जाधव, आदित्य मोर्जे, तन्मय येमकर, डिगू पाटील, विकास पांचाळ, निकिता गवंडी, बंड्या गवंडी, अमित सावंत, उमेश मेस्त्री यांसह अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3846

Leave a Reply

error: Content is protected !!