नारायण राणेंना विजयी करा ; मालवणच्या प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी प्रतिनिधींना आवाहन

भाजपचे लोकसभा संयोजक डॉ. अमेय देसाई यांनी साधला संवाद 

मालवण : लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भाजप महायुतीच्या वतीने मालवण शहरातील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी प्रतिनिधी यांची संवाद बैठक मालवण शहर येथे संपन्न झाली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विजयी करण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले. 

वैद्यकीय विभाग भारतीय जनता पार्टी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संयोजक डॉ. अमेय देसाई यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मुंबई युनिव्हर्सिटी सिनेट मेंबर युवराज लखनराजे भोसले, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते शरद चव्हाण, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, मालवण शहर व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, डॉ. रामचंद्र चव्हाण संयोजक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मालवण शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची संवाद सभा संपन्न झाली. 

या सभेमध्ये जेष्ठ डॉ. शशिकांत झाट्ये, जेष्ठ व्यापारी नाना पारकर, अरविंद सराफ, आशिष कामत, मोहन शिरसाट, हर्षल बांदेकर, गणेश प्रभूलीकर, कैसर पठाण, हरेश देऊलकर, परशुराम पाटकर, नितीन तायशेटये, जॉन नरोना, नाना साईल, प्रसाद धारगळकर, प्रीतम वालावलकर, शिवसेना माजी जिल्हा किसन मांजरेकर  यांसह अन्य व्यापारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!