कुंभारमाठमध्ये भाजप महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ ; अशोक सावंत, रश्मी लुडबे यांची प्रमुख उपस्थिती
राणेसाहेबांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजप महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सर्वत्र सूरू आहे. कुंभारमाठ येथील श्री ब्राम्हण देव मंदिर येथे श्रीफळ ठेवून भाजप महायुती पदाधिकारी यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, महिला आघाडी प्रांतिक सदस्या सौ. रश्मी लुडबे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राणेसाहेबांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी सरपंच पूनम वाटेगावकर, उपसरपंच जिवन भोगावंकर, अशोक चव्हाण, गौरव लुडबे, राजेंद्र लुडबे, राकेश सावंत, दिलीप सांगवेकर, भगवान नेरुरकर, प्रिया गोवेकर, अनिता गोवेकर, आचल गावठे, आरती गुडेकर, अर्चना वाटेगावंकर, बाळकृष्ण गुडेकर, विनय गावकर, मनोज वाटेगावकर, रंगरावं वडर, सुनील वस्त, महेश पाटील, प्रकाश भोगावकर, सुंदर चव्हाण, सर्वेश भोगावकर, सदा चव्हाण, सुमित भोगावकर, मनोज डिचवलंकर, जगदीश शिरोडकर, संदीप फोडेकर व अन्य उपस्थित होते.