दत्ता सामंत यांचा धडाका ; आडवली मालडी, असगणीत उबाठाला धक्का !

आडवली मालडी घाडीवाडी येथील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश तर असगणी कुस्थळकरवाडी येथीलही उबाठा कार्यकर्ते भाजपात

मालवण : मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी ठाकरे गटाला एका पाठोपाठ एक असे जोरदार धक्के देत भाजप पक्ष प्रवेशांचा धडाका लावला आहे. आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघात घाडीवाडी येथील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तर असगणी कुस्थळकरवाडी येथील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. 

आडवली मालडी मध्ये भाजप कार्यकर्ते विजय घाडीगांवकर यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी प्रवेशकर्ते भिकाजी घाडीगांवकर, निवृत्ती घाडीगांवकर, दिलीप घाडीगांवकर, प्रभाकर घाडीगांवकर, अशोक घाडीगांवकर, जितेंद्र घाडीगांवकर, अनिकेत घाडीगांवकर, शिवाजी घाडीगांवकर, गुरूदास घाडीगांवकर, साईराज घाडीगांवकर, यशवंत घाडीगांवकर, राजाराम घाडीगांवकर, सचिन घाडीगांवकर, विलास घाडीगांवकर, रवींद्र घाडीगांवकर, सुरेश घाडीगांवकर, रामू घाडीगांवकर, देविदास घाडीगांवकर, सुरेश घाडीगांवकर, नंदकुमार घाडीगांवकर, हर्षद घाडीगांवकर, दाजी घाडीगांवकर, उमेश साटम, भालचंद्र घाडीगावकर, जितेंद्र तावडे, रवींद्र तावडे, राजाराम रामचंद्र घाडीगांवकर यांसह अनेक कार्यकर्ते यांनी पक्षप्रवेश केला. दत्ता सामंत यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी माजी उपसभापती राजु परुळेकर, कमलाकांत कुबल, माजी नगरसेवक दीपक पाटकर, युवा उद्योजक विनायक बाईत, शक्ती केंद्र प्रमुख निलेश बाईत, माजी सरपंच प्रशांत परब, मंगेश यादव, राजेश तांबे, अरूण परब, प्रकाश कासले यांसह आडवलीतील भाजपचे प्रमुख आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

तर असगणी येथील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला. यामध्ये प्रवेशकर्ते राजाराम बाबुराव लब्दे, सुरेश सीताराम बाईत, बाबा राऊत, सागर धुरी, शशिकांत बाईत, शामसुंदर राऊत, प्रवीण राऊत, वसंत राऊत, सुधीर लब्दे, संतोष परब या सर्वांचे दत्ता सामंत यांनी भाजप पक्षात स्वागत केले. यावेळी जि. प. माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, महेंद्र चव्हाण, दादा नाईक, विभाग अध्यक्ष प्रशांत परब, मठबुद्रुक उपसरपंच युवा उद्योजक विनायक बाईत, शक्ती केंद्र प्रमुख निलेश बाईत, शक्ती केंद्र प्रमुख राजेश तांबे, बुथ अध्यक्ष प्रकाश कासले, माजी सरपंच अरुण परब, वैभव पारकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!