विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल ; शिवसैनिकांचे रत्नागिरीत मोठे शक्तीप्रदर्शन

महायुतीचा उमेदवार कोणीही असो, अडीच लाख मतांनी पराभव करणार : खा. राऊत यांचा विरोधकांना इशारा

रत्नागिरी : इंडिया आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज अर्ज दाखल केला. या निमित्ताने शिवसैनिकांनी रत्नागिरीत मोठे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की मी उमेदवारी अर्ज भरला याचा मला आनंद आहे. माझा विजय निश्चित आहे. महायुतीचा जो कोणी उमेदवार रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून उभा राहील त्यांनी ठरवून यावं की त्याचा अडीच लाखांनी पराभव होणार आहे, असेही राऊत म्हणाले. यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, युवा सेना अध्यक्ष वरून सरनाईक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, संदेश पारकर, राजेंद्र महाडिक, बंडया साळवी, आबा घोसाळे संजय साळवी, प्रशांत साळूंखे, संजय पडते, भाई गोवेकर, सुशांत नाईक, हरी खोबरेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!