वराड कुसरवे येथील प. पू. राणे महाराज मठात रामनवमी व पुण्यतिथी उत्सव
उद्यापासून दोन दिवस भरगच्च कार्यक्रम
मालवण : योगीराज प. पू सद्गुरू श्री राणे महाराज मठात दिनांक १७ व १८ एप्रिल रोजी रामनवमी उत्सव व प. पू. राणे महाराज यांचा नववा पुण्यतिथी उत्सव भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवनिमित्त राणे महाराज यांच्या वराड कुसरवेवाडी येथील मठात भरगच्च असे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार १७ एप्रिल रोजी रामनवमी उत्सवनिमित्त सकाळी मूर्ती अभिषेक, रामजन्म कीर्तन, दुपारी रामजन्म, महाआरती, अखंड महाप्रसाद, रामनाम जप, सायंकाळी हरिपाठ, स्थानिक भजने तर गुरुवार १८ एप्रिल रोजी राणे महाराज यांचा नववा पुण्यतिथी उत्सव निमित्त सकाळी महाराजांच्या पादुकांवर अभिषेक, रामनाम जप, बुवा संदेश सामंत झाराप यांचे सुश्राव्य गायन, दुपारी महाआरती, अखंड महाप्रसाद, सायंकाळी गुरुनाथ म्हाडगुत कट्टा यांचे घर ते प. पू. राणे महाराज मठापर्यंत पालखी मिरवणूक सोहळा, रात्रौ ८ वा. दत्त माऊली दशावतार लोककला नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा वज्रांगधारी गिरीधर हा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प. पू. राणे महाराज सेवा ट्रस्ट यांनी केले आहे.