भाजपा नेते दत्ता सामंत यांच्याकडून आंब्याचा हार घालून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शुभेच्छा
मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्यासह मालवण मधील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी दत्ता सामंत यांनी हापूस आंब्यांचा हार घालून दादांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार नितेश राणे यांसह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजु परुळेकर, गणेश कुशे, नाना साईल, प्रशांत परब, महेश सारंग, प्रमोद करलकर, राजु बिडये, भाई मांजरेकर, शानू वालावलकर, महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर, संतोष कोदे, बाळू कुबल यांसह पदाधिकारी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.