चिंदर मधील भाजपा कार्यकर्ते मंगेश गावकर यांच्या पाठीवर दादांकडून कौतुकाची थाप

गावकर यांनी काही महिन्यांपूर्वी उबाठा मधून भाजपात केलाय प्रवेश ; डॅशिंग कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या मंगेश गावकर यांचे राणेनी केले स्वागत

मालवण | कुणाल मांजरेकर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ७२ वा वाढदिवस कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर पार पडला. या निमित्ताने ना. राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या चिंदर येथील भाजपा कार्यकर्ते मंगेश गावकर यांच्या पाठीवर दादांनी कौतुकाची थाप दिली. मंगेश गावकर यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटातून भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत चिंदर गावातील उबाठाचे तीन ग्रा. पं. सदस्य देखील भाजपात दाखल झाले होते. त्यांच्या कार्याची दखल घेत ना. राणे यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, संतोष कोदे, दीपक पाटकर, भाई मांजरेकर आणि भाजपचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!