भाजपाच्या विस्तृत कार्यकारणीची उद्या दुपारी मालवणात तातडीची सभा

ना. नारायण राणे, निलेश राणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती 

मालवण : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी मालवणची तातडीची विस्तृत कार्यकारणी सभा शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता येथील दैवज्ञ भवन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेला केंद्रीय मंत्री नारायण राणे, मालवण कुडाळ विधानसभा संयोजक निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत मार्गदर्शन करणार आहेत. तरी बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, वॉरियर्स, जिल्हा पदाधिकारी, तालुका व शहर कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य, सर्व आघाडी, सेलचे अध्यक्ष व कार्यकारणी, आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक लोकप्रतिनिधी, सर्व सरपंच, सर्व विकास सोसायटीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महिला तालुकाध्यक्ष सौ. पूजा करलकर, शहर अध्यक्ष सौ.अन्वेषा आचरेकर, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष मंदार लुडबे, अविनाश लाड, शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!