केंद्रीयमंत्री नारायण राणे मालवणात ; भाजपा कार्यकर्त्यांनी केलं जंगी स्वागत

राणेंनी कार्यकर्त्यांकडून घेतला संघटनात्मक कामकाजाचा आढावा

मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी दुपारी येथील भाजप कार्यालयास भेट देत उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून संघटनात्मक कामाकाजाचा आढावा घेतला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, महेश मांजरेकर, गणेश कुशे, बाबा मोंडकर, महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर, पुजा वेरलकर, भाऊ सामंत, अशोक तोडणकर, आबा हडकर, सुहास हडकर, नाना साईल, उमेश नेरुरकर, जॉन नरोना, डॉ. झांटये, महेंद्र चव्हाण, महेश सारंग, अवी सामंत, अमित गावडे, महेश गांवकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, महिमा मयेकर, कोचरेकर, बाळू तारी, राजु बिडये, विजय चव्हाण, विजय निकम, सौरभ ताम्हणकर, मंदार लुडबे, ललित चव्हाण, संदिप मालंडकर, भाई मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!