घुमडाई मंदिरात उद्या (शनिवारी) त्रैवार्षिक सत्यनारायणाची महापूजा ; विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम

मालवण : घुमडे गावाचे ग्रामदैवत श्री घुमडाई मंदिरात उद्या शनिवार दि. ६ एप्रिल रोजी त्रैवार्षिक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वा. पासून स्थानिकांची सुश्राव्य भजने आणि रात्री ९ वाजता वावळेश्वर दशावतारी नाट्यमंडळ तेंडोली यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!