लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची उद्या (बुधवारी) सकाळी कुडाळात संघटनात्मक आढावा बैठक
शक्तिकेंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स, बूथ प्रमुख यांचा घेणार संघटनात्मक आढावा
सायंकाळी ४ वाजता होणार महायुतीची पदाधिकाऱ्यांची बैठक ; जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती
केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह मान्यवर नेत्यांची उपस्थिती
सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी ऍक्टिव्ह मोडवर आली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बूथ संघटनात्मक आढावा बैठक बुधवारी ३ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. तर सायंकाळी ४ वाजता याच ठिकाणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे. या बैठकीला केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपा नेते निलेश राणे, आ. नितेश राणे, माजी आ. प्रमोद जठार, अतुल काळसेकर राजन तेली तसेच अन्य दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी निवडणूक होत आहे. महायुतीच्या वतीने अद्याप पर्यंत ही जागा कोण लढवणार हे जाहीर झाले नसले तरी या ठिकाणी विजय मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची बूथ संघटनात्मक आढावा बैठक बुधवारी ३ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता कुडाळ मधील महालक्ष्मी हॉल मध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे वॉरियर्स, सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख निमंत्रित करण्यात आले आहेत. तर दुपारी ४ वाजता याचं ठिकाणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे.