खा. विनायक राऊत उद्या ३ एप्रिलला मालवण तालुका दौऱ्यावर ; ग्रामस्थांच्या घेणार गाठीभेटी

मालवण : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार, शिवसेना नेते तथा इंडिया आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत बुधवार दि. ३ एप्रिल रोजी मालवण तालुका दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये ते इंडिया आघाडीचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेणार आहेत.

त्यांचा मालवण तालुका दौरा पुढीलप्रमाणे – सकाळी १० वा. सुकळवाड, १०.३० वा. तिरवडे, ११.३० वा. पेंडुर, दुपारी १२ वा. चाफेखोल, १ वा. नांदरुख, ३ वा. तारकर्ली, ४ वा. सर्जेकोट, सायंकाळी ५ वा. तोंडवळी, ६ वा. चिंदर, ७ वा. मठबुद्रुक, रात्रौ ९ वा. वडाचापाट येथे ते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यामध्ये संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर तसेच अन्य पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तरी इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!