“स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपट शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दाखवणार मोफत ; सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाचे आयोजन
५ एप्रिलला देवबागच्या समर्थ थिएटर मध्ये दाखवणार शो ; विद्यार्थ्यासोबत एका पालकाला मोफत पास
मालवण : भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट सिने कलाकार रणदीप हुड्डा यांनी प्रकाशित केला आहे. स्वातंत्रवीर सावरकर कोण होते ? त्यांचं भारताच्या स्वातंत्र्यात काय योगदान होते ? त्यांनी हिंदू राष्ट्रासाठी काय बलिदान केले ? त्यांनी काय काय शिक्षा भोगली या सर्व गोष्टींवर आधारित हा चित्रपट आहे.
सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या विद्यमाने “स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपट शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता मोफत दाखविण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक ५ एप्रिल रोजी दुपारी ठीक ३ वाजता समर्थ चित्रपटगृह देवबाग येथे मोफत शो विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणार आहे. विद्यार्थ्या सोबत एक पालकाला मोफत पास देण्यात येणार आहे. तरी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय मधील शिक्षकांनी आपल्या शाळेतील तसेच महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ द्यावा असे आवाहन सौरभ ताम्हणकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सौरभ ताम्हणकर 7588564887 व 9209333012 या क्रमांकावर संपर्क साधावा.