मालवण शहराच्या प्रवेशद्वारावर देऊळवाडा येथील धोकादायक वळणावर गतिरोधक उभारा 

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांची सा. बां. च्या अधिकाऱ्यांकडे मागणी

मालवण : मालवण शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा येथे होणारे वाढते अपघात टाळण्यासाठी येथे गतिरोधक उभारण्यात यावेत, अशी मागणी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मालवण शहर हे पर्यटन शहर असल्याने शहरास भेटी देणा-या पर्यटकांचा ओघ सातत्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे देऊळवाडा हा मालवण शहरात प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग असल्याने पर्यटकांची व नागरीकांची वर्दळ जास्त प्रमाणात होत असते. मालवण देऊळवाडा कसाल राज्य मार्ग क्रमांक १८२ रस्त्यास ते भरड मालवण या मुख्य रस्त्यास जोडला गेलेला आहे. सदर रस्ता हा आपल्या कार्यालयाच्या अखत्यारीत येत असल्याने मालवण शहर देऊळवाडा नारायण मंदिर व जिल्हा परिषद देऊळवाडा प्राथमिक शाळा या ठिकाणी गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. २०२३ पूर्वी या ठिकाणी गतिरोधक अस्तित्वात होते. आजवर अति वेगात येणा-या डंपरमूळे सायकल, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने, शाळकरी मुले यांचे या ठिकाणी ६ अपघात या ठिकाणी घडले आहेत. त्या अपघाताची नोंद मालवण पोलीस ठाणे अंतर्गत आहे. गतिरोधक झाले तर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या वेगावर मर्यादा येईल. अपघात होणार नाहीत. तरी या ठिकाणी पूर्वी गतिरोधक होते त्या ठिकाणी गतिरोधक बसवून दयावेत ही तमाम मालवण शहर वासियांची मागणी आहे. सदर पत्राचा गांभिर्याने विचार करुन गतिरोधक बसविण्या संदर्भात आपण काय कार्यवाही केली? अथवा करणार ते आम्हाला अवगत करावे. अन्यथा जनतेने आंदोलन मार्ग उभारला तर त्याची जबाबदारी आपल्या विभागाची राहील याची नोंद घ्यावी. असे या पत्रात म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!