मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तपदी सागर कुवेस्कर यांची नियुक्ती ; पारंपरिक मच्छिमारांनी केले स्वागत

मालवण : येथील मत्स्यव्यवसाय विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून सागर कुवेस्कर यांची नियुक्ती झाली आहे. याबद्दल पारंपरिक मच्छीमार नेते बाबी जोगी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी राजू परब, अक्षय रेवडकर, हेमंत मोडकर, गणपत आडीवरेकर आदी उपस्थित होते. यावेळी मच्छीमाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी आपण कायद्याचं पालन करून मच्छीमाऱ्यांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्याचे आश्वासन श्री. कुवेस्कर यांनी मच्छीमारांना दिले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!