निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवणात शालेय विद्यार्थ्यांना दप्तर आणि खाऊ वाटप

मालवण : भारतीय जनता पार्टी कुडाळ मालवण विधानसभा संयोजक, माजी खासदार निलेश राणे यांच्या १७ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी मालवण व भाजपा महिला आघाडी तर्फे शनिवारी सकाळी टोपीवाला हायस्कूलमधील काळेबाईंची बालवाडी व कन्याशाळा येथील बालवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी निलेश राणे यांना संस्कृत श्लोक म्हणून शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य गणेश कुशे, दीपक पाटकर, पंकजा साध्ये ,ललित चव्हाण ,पंकज पेडणेकर ,महेश सारंग, पंकज राणे ,नरेंद्र जामसांडेकर ,महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, दिव्या कोचरेकर, महिमा मयेकर, वैष्णवी मोंडकर, तारका चव्हाण, नमिता गावकर व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!