इंदिरा कॉम्प्लेक्स ते नगरपरिषद मार्गचे डांबरीकरण पूर्ण ; यतीन खोत यांनी केली होती मागणी
भरड नाका ते हडकर मार्ग डांबरीकरण काम देखील पूर्ण ; यतीन खोत यांनी मानले संबंधितांचे आभार…
मालवण : मालवण नगरपरिषद हद्दीतील इंदिरा कॉम्प्लेक्स ते नगरपरिषद रस्ता खड्डेमय बनला होता. या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या माध्यमातून मागणी करून त्याचा पाठपुरावा सूरू होता. अखेर या मार्गाचे नगरोत्थान जिल्हास्तर निधीतून डांबरीकरण पूर्ण झाले आहे. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान भरड नाका ते हडकर मार्ग रस्ता डांबरीकरण करणे, हे काम देखील पूर्ण झाले आहे. याबाबतही यतीन खोत यांनी मागणी करून पाठपुरावा केला होता. परिसरातील रस्ते विकासकामे पूर्ण झाली आहेत. विकासकामे पूर्ण करण्यात ज्यांचे ज्यांचे योगदान आहे त्या सर्वांचे यतीन खोत यांनी आभार मानले आहेत.