मालवणात मनसेच्या नूतन शाखेचे उदघाटन

मनविसे राज्य प्रमुख संघटक यश सरदेसाई यांची उपस्थिती

मालवण : शहरातील मनसेच्या नूतन शाखेचे उदघाटन मनसेचे पक्षनिरीक्षक गजानन राणे व संदीप दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत मनविसे राज्य प्रमुख संघटक यश सरदेसाई यांच्या हस्ते फित कापून नुकताच करण्यात आले. 

मनसे महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस यांच्या माध्यमातून या शाखेचा शुभारंभ झाला. प्रसिद्ध स्वराज्य ढोलपथकाच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजीसह, असंख्य ज्येष्ठ व युवा मनसैनिकांच्या उपस्थितीत हा शानदार शुभारंभ सोहळा पार पडला. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष धीरज परब, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस, अनिल केसरकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर, अमित इभ्रामपूरकर, दया मेस्त्री, विशाल ओटवणेकर, गुरु तोडणकर, विल्सन गिरकर, आबा आडकर तसेच माळगाव शाखाध्यक्ष हर्षद पाटकर, देवगड तालुका महिला उपाध्यक्ष स्वाती सावंत, रश्मी दाभोलकर, ज्येष्ठ व युवा मनसैनिक, मनविसे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मनसे महिला कार्यकर्त्या उपस्थित होते. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!