पूनम चव्हाण : शिवसेनेचं मालवण तालुक्यातलं उच्चविद्याभूषित आक्रमक नेतृत्व

३७ वा वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष

कुणाल मांजरेकर ( मालवण )

२१ वं शतक हे युवकांचा काळ म्हणून ओळखलं जातं. आजची युवा पिढीच उद्याचा समर्थ देश, समर्थ राष्ट्र घडवणार आहे. आज राजकीय आणी सामाजिक क्षेत्रात देखील युवा वर्गाने आपलं मजबूत स्थान निर्माण केलं असून प्रत्येक पक्षाने देखील युवा वर्गाच्या ताकदीकडे लक्ष केंद्रित करून आपली संघटन शक्ती मजबूत करण्याचं काम सुरु केल आहे. असच मालवणच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीत आघाडीवर असणार एक नाव म्हणजे मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी तालुका समन्वयक सौ. पूनम नागेश चव्हाण ! सौ. पूनम चव्हाण यांचा आज १६ मार्च रोजी ३७ वा वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा….

पूनम चव्हाण उर्फ पूर्वाश्रमीच्या पूनम शिवाजी परब ह्यांच्या घराण्याला राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे. मसुरे गावच्या धडाडीच्या नेत्या असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. सरोज परब यांची कन्या पूनम यांना लहानपणापासून घरातूनच राजकारण आणि समाजकारणाचे धडे मिळाले. लहानपणीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने त्या प्रेरित झाल्या होत्या. लेखन, वाचन, समाजकारणाची त्यांना आवड होतीच. त्यामुळे M.A., D.Ted, B.ed आणि कायद्याच्या शेवटच्या वर्षापर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. शिवसेनेच्या प्रत्येक उपक्रम, आंदोलनात हिरीरीने सहभाग घेत शिवसेनेची महिला फळी मजबूत करण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच शिवसेनेच्या महिला आघाडीचं तालुका समन्वयक पद त्यांना देण्यात आलं. या पदाच्या माध्यमातून मालवणात महिलांचं एक उत्तम संघटन उभारण्याचं काम अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी केलं आहे. समाजकारण करताना तन, मन, धन अर्पून त्यांनी आपला सहभाग दर्शवला आहे. शहरातील वायरी आडवण भागातील अनेक विकास कामात त्यांनी सक्रिय योगदान दिले असून शिवसेनेच्या माध्यमातून या परिसरातील विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. आपल्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वाटचालीत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, युवतीसेना पदाधिकारी रुची राऊत, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह अन्य मान्यवर नेत्यांचे आणि कुटुंबाचे आपल्याला पूर्ण सहकार्य मिळाल्याचे त्या सांगतात. आगामी कालावधीत मालवण नगरपालिकेवर पुन्हा एकदा स्व. बाळासाहेब ठाकरेंचा भगवा ध्वज अभिमानाने फडकवण्या बरोबरच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी सर्व सहकारी पदाधिकारी आणि शिवसैनिकांना सोबत घेऊन आपण सर्व शक्ती पणाला लावून काम करणार असल्याची प्रतिक्रिया सौ. पूनम चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना भविष्यातील सर्व स्वप्नांना पूर्ण करण्याचे बळ त्यांना मिळो, ही प्रार्थना… 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!