भाजपा नेते दत्ता सामंत यांची आंगणेवाडीला भेट ; ग्रामस्थ मंडळाकडून सत्कार

भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेसनेही केला सन्मान

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी शनिवारी आंगणेवाडी जत्रेला भेट देऊन श्री भराडी देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळासह भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

शनिवारी रात्री दत्ता सामंत यांनी आंगणेवाडी जत्रेला भेट दिली. यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आनंद आंगणे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला. तर भाजप मसुरे विभागाच्या संपर्क कार्यालयात माजी उपसभापती छोटू ठाकूर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, दया देसाई, राजू बिडये यांच्यासह अन्य भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना संपर्क कार्यालयात युवासेनेचे जिल्हा समन्वयक उदय राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, नीलम शिंदे तसेच अन्य पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. 

राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने उभारण्यात आलेल्या संपर्क कार्यालयात युवक काँग्रेसचे पदाधिकारी देवानंद लुडबे यांच्या हस्ते दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, पल्लवी तारी, योगेश्वर कुर्ल तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तर भाजपा सिंधुदुर्ग यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या संपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दत्ता सामंत यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा भाजपा आणि तालुका भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!