मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह दिग्गज नेत्यांची शिवसेनेच्या कार्यालयास भेट
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत
मालवण : आंगणेवाडी यात्रे निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सह दिग्गज नेत्यांनी याठिकाणी उपस्थिती दर्शवली. शिवसेनेच्या वतीने आंगणेवाडी यात्रोत्सवात उभारण्यात आलेल्या कार्यालयाला एकनाथ शिंदे, नारायण राणे यांच्यासह अन्य मान्यवर नेत्यांनी भेट दिली असता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही नेत्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
सकाळच्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार रवींद्र फाटक यांनी शनिवारी आंगणेवाडी येथे श्री भराडी देवीच्या यात्रेच्या निमित्ताने आंगणेवाडी येथे दाखल होत देवीचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, विश्वास गांवकर, राजा गांवकर, पराग खोत, बाळू नाटेकर व अन्य पदाधिकारी यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपस्थित सर्व नेतेमंडळी यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी शिवसेना कार्यालयाला भेट दिली असता त्यांचे स्वागत करण्यात आले.
तर दुपारी भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आंगणेवाडीला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसेना कार्यालयाला भेट दिली असता तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपा नेते निलेश राणे यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.