आंगणेवाडी यात्रा | ठाकरे शिवसेनेच्यावतीने मालवण शहरातील प्रभाग ९ मधील भाविकांसाठी मोफत बससेवा 

मनोज मोंडकर, पूनम चव्हाण यांचा सलग दुसऱ्या वर्षी उपक्रम

मालवण | कुणाल मांजरेकर

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रेचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण शहरातील प्रभाग क्र. ९ मधील भाविकांसठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली. याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. मधुकर लुडबे यांच्या हस्ते या बससेवा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मनोज मोंडकर, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, शाखा प्रमुख किशोर गावकर, मोहन मरळ, प्रसाद आडवणकर, रविना लुडबे, भाई लुडबे, संतोष लुडबे आदी उपस्थित होते. 

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!