टोपीवाला बोर्डींग मैदानावर १७ ते २४ मार्चपर्यंत “मालवण प्रीमिअर लीग” लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा

पर्व सातवे ; विजेत्या संघाला ५५,५५५ रुपये आणि चषक तर उपविजेत्या संघाला ३३,३३३ रुपये व चषक

मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सौरभ ताम्हणकर आणि उपाध्यक्ष गौरव लुडबे यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण कुडाळ तालुक्यातील नावाजलेल्या अशा मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने एकमेव लेदर बॉल लीग पद्धतीच्या “मालवण प्रीमिअर लीग” क्रिकेट स्पर्धेचे १७ मार्च ते २४ मार्च या कालावधीत टोपीवाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी स्पर्धेचे हे सातवे पर्व असून विजेत्या संघाला ५५,५५५ रुपये आणि चषक तर उपविजेत्या संघाला ३३,३३३ रुपये व चषक दिला जाणार आहे, अशी माहिती मालवण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर व उपाध्यक्ष गौरव राजेंद्र लुडबे यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली आहे. 

या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघातील खेळाडूंची निवड प्रक्रिया लिलाव पद्धतीने करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी खेळाडूंनी प्रवेश अर्ज भरायचे आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी २०० रुपये असून प्रवेश अर्ज भरायची अंतिम तारीख ०५ मार्च आहे. प्रवेश अर्ज मॉन्जिनीस केक शॉप, भरड नाका, मालवण येथे उपलब्ध आहेत. तरी अधिक माहितीसाठी गौरव लुडबे 9420890110, सौरभ ताम्हणकर 7588564887, सुशील शेडगे 7499955147 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!