माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचा बांधकाम कामगारांनी केला हृदय सत्कार
दीपक पाटकर यांच्या प्रयत्नातून बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देणारे अधिकारी मालवण नगरपरिषदेत नियुक्त झाल्याबद्दल कृतज्ञता
मालवण : बांधकाम कामगार यांनी वर्षभरात ठेकेदार किंवा मालक यांचेकडे ९० दिवस काम केल्याचे शासन आदेशानुसार प्रमाणपत्र मालवण नगरपरिषदेमार्फत दिले जाते. मात्र संबंधित अधिकारी यांची नियुक्ती मालवण नगरपरिषद येथे नसल्याने बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र अभावी मंडळाच्या लाभांपासूनही वंचीत राहात होते. ही समस्या लक्षात घेऊन माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांच्या मार्फत प्रयत्न करुन मालवण नगरपरिषदेमध्ये अधिकारी नियुक्ती करुन घेण्यात महत्वाची भूमिका बजावली. याबाबत मालवण शहरातील बांधकाम कामगारांनी गुरुवारी भाजप मालवण शहर कार्यालयात भेट घेत कार्यसम्राट माजी नगरसेवक दिपक पाटकर यांचा कृतज्ञतापूर्वक हृदय सत्कार केला.
यावेळी संजय वायंगणकर, प्रदीप कोरगावकर, राजू किर, सत्यवान मोर्जे, जयेश यमकर, ज्ञानेश कांबळी, अजित आचरेकर, समिर मुंबरकर, गणपती कोडचवाडकर, संजीव बिडये, किरण जाधव यांसह अन्य कामगार तसेच भाजप युवामोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण, भाई मांजरेकर उपस्थित होते.
असंघटित नोंदीत व अनोंदीत बांधकाम कामगारांना मागील वर्षभरात ठेकेदार किंवा मालक यांचे जवळ ९० दिवस काम केल्याचे शासन आदेशानुसार प्रमाणपत्र देण्यासाठी मालवण नगरपरिषदे मध्ये गेले अनेक महिने अधिकारी नियुक्त नव्हते. शेकडो कामगार प्रमाणपत्र मिळणेसाठी नगरपरिषद मध्ये पायपीट करत होते. बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र अभावी मंडळाच्या लाभांपासूनही वंचीत राहात होते. कारण नगरपरिषद ९० दिवस प्रमाणपत्राशिवाय कामगारांची नोंदणी किंवा नुतनीकरण होत नव्हते. मालवण शहरातील काही असंघटित बांधकाम कामगारांनी काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक दिपक पाटकर यांची भाजप कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याजवळ कैफियत मांडली. तसेच ९० दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मालवण नगरपरिषदे मध्ये अधिकारी नेमणूकीसाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली होती. कामगारांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन नगरसेवक दिपक पाटकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांच्या मार्फत प्रयत्न करुन बांधकाम कामगारांना ९० दिवस कामाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मालवण नगरपरिषदे मध्ये अधिकारी नियुक्ती करुन घेण्यात महत्वाची भूमिका बजावली. मालवण शहरातील बांधकाम कामगारांची होणारी गैरसोय त्यामुळे दूर झाली आहे.