आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादित मालाचे  प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे १ मार्च रोजी उदघाटन

आमदार नितेश राणे यांच्याहस्ते होणार उदघाटन ; ३ मार्च पर्यंत सुरु प्रदर्शन, विक्री सुरु

सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि नाबार्डचा संयुक्त उपक्रम

मालवण : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ शुक्रवार १ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते श्री देवी भराडी मंदिर नजिक आंगणेवाडी येथे करण्यात येणार आहे.                               

या शुभारंभ सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा प्रबंधक नाबार्ड अजय थुटे, जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे, आंगणेवाडी विकास समिती अध्यश भास्कर आंगणे, मसुरे सरपंच संदिप हडकर, देउळवाडा सरपंच सौ.सुरेखा वायंगणकर, उमेदचे वैभव पवार, महिला विकास आर्थिक महामंडळ समन्वय अधिकारी नितीन काळे, श्रीम. मानसी पालव सरपंच ग्रामपंचायत बिळवस आंगणेवाडी, बँक संचालक संदिप परब, व्हीक्टर डान्टस, मेघनाथ धुरी, जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी मान्यवर उपस्थित  रहाणार आहेत

आंगणेवाडी व देउळवाडा गावच्या ग्रामस्थांनी तसेच यात्रेस आलेल्या भाविकांनी व जिल्हा बँकेचे तालुक्यातील विकास अधिकारी, कर्मचारी यांनी सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे. सदर बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री १ ते ३ मार्च २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!