मालवण शहरासाठी नगरोत्थान व जिल्हा नियोजन विशेष निधीतून २२ विकास कामे मंजूर 

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांचा पाठपुरावा ; शहर भाजपाच्या वतीने शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी मानले आभार

मालवण शहरातील विकास कामे मीच मंजूर केल्याचे विरोधी पक्षाच्या काही माजी नगरसेवकांचा केवीलवाणा प्रयत्न

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीस अनुसरून नगरोध्यान व जिल्हा नियोजन विशेष निधीतून २२ विकासकामे मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मालवण कुडाळ विधानसभा संयोजक निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न करून हा निधी उपलब्ध करून घेतला आहे. त्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण व निलेश राणे यांचे भारतीय जनता पार्टी मालवण शहराच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शहर प्रभारी विजय केनावडेकर यांनी व्यक्त केली आहे.

मालवण शहरांमध्ये जनतेला आवश्यक असणारी विकासकामे भारतीय जनता पार्टी मार्फत महायुतीचे सरकार आल्यानंतर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी आवश्यक असणारी शासकीय कागदपत्रे, पाठपुरावा भारतीय जनता पार्टी मार्फत करण्यात आलेला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष बैठक पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कक्षात घेऊन या संदर्भात मालवण शहरातील होणारी कामे ही दर्जेदार कामे झाली पाहिजे, अशी कामे न झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

मालवण शहरातील विकास कामे मीच मंजूर केली असे भासवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षातील माजी नगरसेवक करताना निदर्शनात येत आहे. यासंबंधी ठेकेदारांना धरून अशा प्रकारची कामे कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न झाल्यास यासंबंधी लेखी तक्रार पालकमंत्री यांच्याकडे भारतीय जनता पार्टी मार्फत करण्यात येणार आहे. ॲडव्हान्स तांत्रिक मंजुरी करून घेणे म्हणजे विकास काम मंजूर करणे असे होत नाही असे करून विकास कामे मीच आणले असे भासवण्याचा प्रयत्न विरोधी माजी नगरसेवक करताना निदर्शनास येत आहे .असे झाल्यास प्रशासनाची तक्रार करण्यास भाजपा मागे पुढे पाहणार नाही. 

त्याचबरोबर मालवणात अत्याधुनिक असे ऐतिहासिक कलादालना साठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचा पालकमंत्री यांनी शब्द दिला आहे. यासंबंधी मालवण नगरपालिका प्रशासन व पालकमंत्री यांची सभा संपन्न झाली आहे. या संदर्भातही पाठपुरावा भाजपा मालवण शहर करीत आहे. राजकोट किल्ला व छत्रपतीचा पुतळ्याजवळील नागरिक सुविधांसाठी पर्यटन विभागामधून वेगळा निधी जिल्हा नियोजन मध्ये मंजूर करून देण्यासाठी निर्देश पालकमंत्री यांनी दिले आहेत, असे विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!