विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याची प्रेरणा घेऊन यश संपादन करावे
एमआयटीएमचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल यांचे प्रतिपादन ; महाविद्यालयाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
मालवण | कुणाल मांजरेकर
सुकळवाड येथील एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात आणि पारंपारिक पद्धतीने आयोजित या सोहळ्याने संपूर्ण महाविद्यालय शिवमय झाले. हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जयघोषाने कॉलेज परिसर दुमदुमून गेला.
यावेळी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ओमकार महदळकर या विद्याथ्यांने पेडगावचे शहाणे ही म्हण का प्रचलित आहे. याचे मूळ है आपल्या छत्रपतीच्या इतिहासात कसे आहे. हे त्यांनी तसेच कमी मनुष्यबळ असताना लढाई कशी जिंकता येते. याचे उत्तम उदाहरण सादर केले. गनिमी कावा म्हणजे काय हे त्याने व्याख्यानातून पटवून दिले. महाराजांवर आधारित नृत्य, किल्लेदार नाटकातून गड स्वच्छतेचा संदेश देणारे तसेच सध्या त्याचा होणारा दुरुपयोग व गड, किल्ल्यांची होणारी हानी यांचे महत्व नाटकाच्या माध्यमातून यावेळी विद्याथ्यांनी सादर केले
एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षी शिवजयंती उत्साहपूर्वक साजरी करण्यात येते. यावर्षीही सकाळी ६ वाजता विद्यार्थी शिवज्योत आणण्यासाठी किल्ले सिंधुदुर्गला गेले. किल्ल्यावर शिवज्योत प्रज्वलित केल्यानंतर ते विद्यार्थी सकाळी ८.३० वाजता कॉलेज कडे माघारी निघाले. सुकळवाड़ बाजारपेठ येथे शिवज्योत घेऊन विद्यार्थी सकाळी ११.३० वाजता दाखल झाले. ढोल ताशाच्या गजरात विदयार्थी शिवज्योत घेऊन कॉलेजला आले. कॉलेजला आल्यानंतर कॉलेजचे प्राचार्य यांच्या हस्ते शिवप्रतीमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी डिग्री कॉलेजचे विद्यार्थी जी.एस. महेश राठोड, सी.एस. हर्ष घाडीगावकर, एन. एस. समता पाटील, एस. एस. ओंकार पवार आणि डिप्लोमा जी. एस. ऐश्वर्या पालव, सी. एस. हेमंत जिक्रमडे, एल. एस. साक्षी जिकमडे, एस. एस. विश्वनाथ सुतार आणि काही विद्यार्थी तसेच कार्यक्रमांचे समन्वयक प्रा. प्रथमेश जठार, प्रा. स्वागत केरकर व प्रा. तुषार तळक्टकर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
यावेळी या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी व यश संपादन करावे, असे आवाहन केले. तर उपप्राचार्य पूनम कदम यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनापासून प्रेरणा घेण्याचे आणि त्यांच्या विचारांचा आपल्या जीवनात आचरण करण्याचे आवाहन केले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय व्यवस्थापनाचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, सेक्रेटरी नेहा पाल, खजिनदार वृषाली कदम आणि संस्थेचे विश्वस्त केतन कदम यांनी विद्याथी व कर्मचान्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.