सहाय्यक सरकारी वकिलांचा वराड- कुसरवे रक्तदाते ग्रुपकडून सत्कार

मालवण : मालवण न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील या पदी नियुक्ती झालेले नांदोस गावचे सुपुत्र ऍड. हृदयनाथ चव्हाण यांचा “वराड – कुसरवे रक्तदाते ग्रुप” यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी वरची गुरामवाडी ग्रामपंचायतचे तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रुपचे मार्गदर्शक सुनील नाईक, वराड पंचायत समिती सदस्य विनोद आळवे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपचे सदस्य ऍड. प्रदीप मिठबावकर, समाजसेवक प्रवीण मिठबावकर, उद्योजक समीर रावले, जगदीश परब, पोलीस नाईक नितीन शेट्ये, युवराज ढोलम, G.H. Fitness चे सर्वेसर्वा गौरव हिर्लेकर, दीपक कवठणकर, सतीश (भाई) वेंगुर्लेकर, राकेश डगरे उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!