“प्रथम ती मालवण सौभाग्यवती” स्पर्धेच्या निमित्ताने आज मालवणात होणार बक्षीसांचा वर्षाव !

सौभाग्यवतींना ४३ इंची स्मार्ट टीव्ही, एअर कुलर, मिक्सर तर लकी ड्रॉ मधील भाग्यवंत विजेत्यांना सोन्याची नथ, गॅस स्टोव्ह, फॅन यांसारखी मिळणार आकर्षक बक्षीसे 

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुका व शहर आणि महिला आघाडी यांच्यावतीने मालवणच्या बंदर जेटीवर आज सायंकाळी ५ वाजता प्रथम ती मालवण सौभाग्यवती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी घसघशीत बक्षिसे जाहीर झाली आहेत. यात प्रथम तीन क्रमांक प्राप्त सौभाग्यवतींना अनुक्रमे ४३ इंची स्मार्ट टीव्ही, एअर कुलर, मिक्सर देण्यात येणार असून या निमित्ताने घेण्यात येणाऱ्या लकी ड्रॉ मधील भाग्यवंत विजेत्यांना सोन्याची नथ, गॅस स्टोव्ह, फॅन यांसारखी आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत.

खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत व युवती सेना सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक रुची राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आज सायंकाळी ५  वाजल्यापासून मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी ”प्रथम ती मालवण सौभाग्यवती’ स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी हळदीकुंकू समारंभ, फनी गेम्स व लकी ड्रॉ चे आयोजनही करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील व शहरातील जास्तीतजास्त महिला, युवती व सौभाग्यवती यांनी या स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आणि महिला आघाडी तालुका समन्वयक पूनम चव्हाण यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!