वायंगणी ग्रामस्थांनी घेतली भाजपा नेते दत्ता सामंत यांची भेट ; गावातील विकास कामांवर चर्चा 

मालवण | कुणाल मांजरेकर : मालवण तालुक्यातील वायंगणी भंडारवाडी येथील ग्रामस्थ आणि भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांची भेट घेऊन गावातील विकास कामांवर चर्चा केली.

गावातील पाटवाडी ते भंडारवाडी हा दोन किमीचा रस्ता बरीच वर्ष दुर्लक्षित आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असून या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबतचे निवेदन देखील यावेळी सादर करण्यात आले. याप्रसंगी माजी सभापती नीलिमा सावंत, डॉ. प्रमोद कोळंबकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, बाबू परब यांच्यासह वायंगणी भंडारवाडी मधील विलास परब, रमाकांत नाईक, मोहन आचरेकर, गणेश धुळे, राजेंद्र पेडणेकर, आनंद कांबळी, शुभम त्रिंबककर, रमेश महाजन तसेच अन्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!