मालवणात २२ फेब्रुवारीला “प्रथम ती” मालवण सौभाग्यवती स्पर्धा

शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या वतीने आयोजन ; मालवण बंदर जेटी येथे होणार स्पर्धा

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  मालवण तालुका व शहर महिला आघाडीच्या वतीने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आणि रुची राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ यावेळेत मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी ‘प्रथम ती मालवण सौभाग्यवती’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच यावेळी हळदीकुंकू समारंभ, फनी गेम्स व लकी ड्रॉ चे देखील आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या मालवण तालुका समन्वयक सौ. पूनम चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण येथील ठाकरे शिवसेना शाखा कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी युवतीसेना जिल्हा विस्तारक रुची राऊत, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, उपजिल्हा संघटक सेजल परब, शहरप्रमुख रश्मी परुळेकर, उपशहरप्रमुख नंदा सारंग, विद्या फर्नांडिस, माजी नगरसेविका नीना मुंबरकर, मंदा जोशी, युवती सेना तालुकाप्रमुख निनाक्षी शिंदे, उपतालुकाप्रमुख स्नेहा शेलटकर, शहरप्रमुख सुर्वी लोणे, उपशहरप्रमुख माधुरी प्रभू, आर्या गावकर, भारती आडकर, मानसी कुर्ले, पायल आढाव, तसेच तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सन्मेष परब, सिद्धेश मांजरेकर, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते. 

प्रथम ती मालवण सौभाग्यवती स्पर्धा मालवण तालुका मर्यादित आहे. यामध्ये पहिल्या फेरीत पारंपारिक वेशभूषा तर दुसऱ्या फेरीत मनपसंद पेहराव व परीक्षक प्रश्नोत्तर असणार आहे. या स्पर्धेसाठी खासदार विनायक राऊत, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, संग्राम प्रभूगावकर आदी व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे यावेळी पूनम चव्हाण यांनी सांगितले. 

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूनम चव्हाण- ९४०४६८९३१६, नीनाक्षी शिंदे- ९३२५९४२७९८, विद्या फर्नांडिस- ७७६७०५३३६४, सूर्वी लोणे- ९४२१९७११५९, माधुरी प्रभू- ८६९८६०८३७४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!