राजकोट किल्ला झाला प्रकाशमान !
पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, प्रभाकर सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा
मालवण | कुणाल मांजरेकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेला राजकोट किल्ला मागील दोन महिने अंधारात होता. याबाबत स्थानिकानी लक्ष वेधल्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांच्या पाठापूराव्याने राजकोट किल्ला येथील विद्युतप्रवाह शिवजयंती दिनी सुरु करण्यात आला आहे. याबाबत राजकोट रहिवाशी संघाने आभार मानले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या राजकोट येथील किल्ल्यावरील विद्युत पुरवठा गेले दोन महिने बंद होता. त्यामुळे संध्याकाळी व रात्रीच्या वेळी येणा-या पर्यटकांना किल्ला पाहताना अडचणी येत होत्या. याबाबत राजकोट रहिवाशी संघाने पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, दिपक पाटकर, विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, राजु बिडये यांनीही सहकार्य कले. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या प्रश्नी लक्ष घालुन अडचणी दुर केल्या. त्यामुळे आता शिवजयंतीपासुन राजकोट किल्यावरील विद्युत पुरवठा सुरु झाला आहे. सोमवारी राजकोट किल्ला येथे विद्युत वितरण कंपनीने मीटर बसवला आहे. विद्युत पुरवठा सुरु झाल्याने आता राजकोट किल्ला प्रकाशमान होणार आहे.