खासदार विनायक राऊत उद्या मालवणात ; विविध विकास कामांची भूमिपूजने
आ. वैभव नाईक यांची उपस्थिती ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती
मालवण : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे उद्या शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी मालवण तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकास कामांची भूमिपूजने होणार असून वायरी कुलस्वामीनी मंदिर नजीक सभामंडपाचे उद्घाटन होणार असून यावेळी आमदार वैभव नाईक हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे.
सकाळी १० वा वराड येथे विकास कामाचे भूमीपुजन, सकाळी ११.३० वा. – सिंधुदूर्ग जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्ट बैठकीस उपस्थिती. स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदूर्ग – ओरोस, दुपारी १ वा. चौके ग्रामपंचायत इमारत भूमीपूजन, दुपारी २.३० वा. मालवण देवली काळेथर येथे विकासकामाचे भूमीपुजन, दुपारी ४ वा. वायरी कुलस्वामीनी मंदिर नजीक सभामंडपाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.