भाजपा नेते दत्ता सामंत यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट ; कुडाळ – मालवण मधील विकास कामांवर चर्चा
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकी बाबत देखील केली चर्चा
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या केसरी मधील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी बाबत देखील चर्चा झाली.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनावडेकर, माजी उपनगराध्यक्ष राजू वराडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, संतोष साटविलकर, दादा नाईक आदी उपस्थित होते.