मालवण शहरातील विविध समस्यांबाबत सौरभ ताम्हणकर यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष
मालवण : मालवण शहरातील विविध समस्यांबाबत भारतीय युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठक निमित्त पालकमंत्री आले असता श्री. ताम्हणकर यांनी त्यांची भेट घेतली.
पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात मालवण नगरपरिषदेत गेले १० वर्ष रिक्त असलेले स्वच्छता निरीक्षक हे पद त्वरित भरणे बाबत तसेच मालवण शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी यांचा बाकी असलेली रक्कम मिळावी व तारकर्ली देवबाग मार्गांवरील जल जीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन साठी रस्त्याच्या कडेने काढलेल्या खड्यांना मुळे झाले दुरावास्थेबाबतचे मुदे त्यांनी नमूद केले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषद हे नेहमीच चर्चेत असतंच त्याचप्रमाणे मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून मालवण नगरीत बरेच विकास कामे झालेली दिसून येत आहेत. मालवण शहर हे पर्यटनाचे केंद्र बिंदू मानले गेले आहे. त्याच पर्यटन नगरीत असलेल्या मालवण नगरपरिषदेने अनेक गोष्टी साकार केल्या आहेत. मालवण नगरीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही वाढत चालली आहे. परंतु मालवण नगरपरिषदेतील अधिकारी अथवा कर्मचारी हे अपुरे पडत आहेत. त्यामुळे मालवण नगरीत पर्यटन स्थळे, मालवण बाजारपेठ, मालवण मधील परिसर हे अस्वच्छ झाले आहेत. अपूर्ण असलेला मालवण नगरपरिषदेचा अधिकारी वर्ग व त्याहून आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक हे पद जून २०१४ पासून रिक्त असल्याची माहिती मला प्राप्त झाली आहे. मालवण नगरीत सध्या ठीक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहेत. त्यामुळे येथील काही भागात पर्यटकांची गैरसोय देखील होत आहे. असे त्यांनी म्हटले आहे.
त्याच प्रमाणे गरीब व गरजू लाभार्थींसाठी मोदी सरकार नेहमीच त्यांच्या हितात राहिली आहे. भारत सरकारच्या विविध योजना हे गरजू पर्यंत पोचत आहेत व त्याचा लॅब देखील घेतलं जात आहे. भारत सरकारच्या प्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” ही मोहिम आखण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या पी.एम.स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस, आयुष्यमान भारत कार्ड शिबिर, मुद्रा लोन योजना, आधारकार्ड अद्यावत करणे, खादी ग्रामोद्योग मंडळ योजना, स्वच्छ भारत मिशन यासारख्या विविध योजनांचे लाभ लाभार्थी घेत आहेत. यातच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मालवण मध्ये काही कुटुंबांनी घेतला आहे. मालवण नगर परिषदेच्या माध्यमातून मालवण नगरीतील सहा लाभार्त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केले होते परंतु त्या पैकी १९ कुटुंबियांना त्याची मंजुरी मिळाली होती. त्यापैकी तीन लाभार्त्यांनि आपली जिओ तेंगिंग पूर्ण करीत बाळकृष्ण लीलाधर तिरोडकर, रा. गवंडीवाडा, ता. मालवण यांना आता पर्यंत १,५०,०००/- रु, अरुण विश्वनाथ परब रा. धुरीवाडा, ता. मालवण यांना आता पर्यंत १,५०,०००/- रु व उमेश चव्हाण रा. देऊळवाडा, ता. मालवण यांना आता पर्यंत १,२०,०००/- रु येवढी रक्कम त्यांना २०२१ मध्ये प्राप्त झालेली आहे व त्या योजने अंतर्गत मिळणारी बाकीची रक्कम त्यांना लवकरात लवकर मिळावी अशी विनंती ह्या पत्राद्वारे ताम्हणकर यांनी केली आहे केले आहे.
तर मालवण देवबाग मार्गांवरील तारकर्ली येथे जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाईपलाईन टाकण्या करिता रस्त्याच्या बाजूने खुदाई करण्यात आली आहे. व त्यामुळे रस्त्याच्या कडेला मातीचा साठा निर्माण होऊन अपघाताची परिस्थिती निर्माण झाली आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित नेव्ही डे तारकर्ली किनाऱ्यावर संपन्न झाले होते. त्यावेळी हे रस्ते नवीन स्वरूपात केले गेले होते परंतु काही दिवसातच जल मिशन योजनेचा अंतर्गत रस्त्याच्या कडेला झालेल्या दुरावस्थेमुळे येथून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. या सर्व विषयांवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.