मालवण पत्रकार समितीचा उद्या पुरस्कार वितरण समारंभ

आ. वैभव नाईक, ज्येष्ठ पत्रकार जान्हवी पाटील, राजेंद्र पराडकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीचा वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ उद्या गुरुवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणच्या सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमांस प्रमुख अतिथी म्हणून आमदार वैभव नाईक, मराठी पत्रकार परिषदेच्या उपाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार जान्हवी पाटील, सेवानिवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराम ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमामध्ये महेंद्र पराडकर यांना स्व. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, झुंजार पेडणेकर यांना स्व. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, प्रशांत हिंदळेकर यांना अमित खोत व मालवण पत्रकार समिती पुरस्कृत बेस्ट स्टोरी अॅवार्ड दिला जाणार आहे. तसेच यावर्षी पासून दोन विशेष पुरस्कार देण्यात येणार असून यंदाच्या वर्षी उद्योजक श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना मालवण रत्न पुरस्कार, रंगभूषाकार तारक कांबळी यांना कलारत्न पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे, सचिव सौगंधराज बादेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!