“एमआयटीएम” च्या दोन माजी विद्यार्थ्यांची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये निवड
मालवण : सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेन्ट (एमआयटीएम) अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी योगेश रामचंद्र आईर (कुडाळ) आणि विठ्ठल तुकाराम राऊळ (सावंतवाडी) यांची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर निवड झाली आहे.
योगेश रामचंद्र आईर आणि विठ्ठल तुकाराम राऊळ यांनी २०१७ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालयामधून प्राप्त केली होती. ते मेहनती आणि हुशार विद्यार्थी होते. ते अनेक स्पर्धा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी ठरले होते. योगेश आईर गेले अनेक वर्ष एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षकी सेवा बजावत होते. ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता करता स्वतः विविध स्पर्धा परीक्षा देत असत. यावेळी त्यांना यश प्राप्त झाले.
एमआयटीएम अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करते. या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी विद्यार्थ्यांची सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात. हे निवड झालेले विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत आणि त्यांना देखील सरकारी नोकरीमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन देतील. या यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल, डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य विशाल कुशे आणि सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, सेक्रेटरी नेहा पात, खजिनदार वृषाली कदम आणि संस्थेचे विश्वस्त केतन कदम यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.