किल्ले सिंधुदुर्गचा परिसर होणार प्रकाशमान ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचा पाठपुरावा

मालवण तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ११ कोटी ९७ लाखांचा निधी ; भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून मालवण तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ११ कोटी ९७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे, सोलर लाईट बसविणे, एलईडी स्ट्रीटलाईट बसविणे या कामासाठी १ कोटी ७ लाख रुपये निधी मंजूर झाले आहेत, अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिली आहे.

यामध्ये कोकण आपत्ती सौमिकरण प्रकल्पा अंतर्गत वरची देवली हडी, कांदळगाव, वायंगणी, हिर्ले, शिवापूर, भगवंतगड, तेरई भगवंतगड, आचरा देऊळवाडा, आडारी, न्हीवे खारभूमी येथे खारभूमी योजना राबविणे – ७ कोटी ८० लाख, श्री देव दांडेश्वर मंदिर ते मोरेश्वर मंदिर दरम्यान संरक्षक भिंत बांधणे. – १ कोटी ६० लाख, मालवण देवबाग तारकर्ली परुळे इ. जि. मा. ५१ रस्ता वाटत व डांबरीकरण करणे. – १ कोटी ५० लाख या कामांचा समावेश आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!