महान येथील निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेत डिसीसी वायरी संघ विजेता

शांतादुर्गा वडाचापाट संघाला उपविजेतेपद ; गांगेश्वर क्रिकेट क्लब महान यांच्यावतीने आयोजन

मालवण : मालवण तालुक्यातील महान गावात भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संग्राम सुधीर साळसकर आणि उद्योजक मंगेश रवींद्र साळसकर यांच्या संकल्पनेतून श्री गांगेश्वर क्रिकेट क्लब, महानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निलेश राणे चषक क्रिकेट स्पर्धेत डिसीसी वायरी संघाने विजेतेपद पटकावले. तर शांतादुर्गा वडाचापाट हा संघ उपविजेता ठरला.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी पंचायत समिती सभापती सुधीर साळसकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी जि. प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, मदन घाडी, सुहास साळुंखे, महान सरपंच अक्षय तावडे, उपसरपंच अजित राणे, संग्राम साळसकर, मंगेश साळसकर, श्यामा घाडी यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अशोक जाधव, निळकंठ घाडी, संदीप शिंदे, दिनेश घाडी, रेजन घाडी, प्रसाद जाधव, सागर शिंदे, हेमंत शिंदे, अक्षय जाधव, ओंकार शिंदे, सागर शिंदे, राजन घाडी, राजू घाडी, अवधूत जाधव, दीपक घाडी, सोनू शिंदे, प्रकाश शिंदे, आदित्य घाडी, रामचंद्र नेरकर, सोनू कुर्ले, छोटू सामंत, भावेश पालव, शुभम हळवे, निलेश चव्हाण आदिंसह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विजेत्या संघाला १० हजार २४ व चषक तर उपविजेत्या संघाला ७ हजार २४ रुपये व चषक पारितोषिक देण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!