माजी आमदार परशुराम उपरकर यांना वाढता पाठींबा
मालवण मधील अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांचा मनसेला “जय महाराष्ट्र” ; जीजी जो राजकीय निर्णय घेतील त्यासोबत जाण्याचा निर्णय
मालवण : माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसे सरचिटणीस पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मनसेच्या मालवण तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक आजी माजी पदाधिकारी यांनी मनसेचा राजीनामा देत परशुराम उपरकर जो राजकीय निर्णय घेतील त्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
यात मनसे माजी शहरअध्यक्ष भारती वाघ, विध्यार्थी मनसेना उपतालुकाध्यक्ष जनार्दन आजागावकर, माजी तालुकध्यक्ष प्रशांत पराडकर, सर्जेकोट शाखाध्याक्ष दर्शन सावजी यांसह मिलिंद तेली, पांडुरंग करवडकर, सुदेश जामसंडेकर, विनायक परब, राजेश केळुस्कर, रुपेश केळुस्कर, दर्शन सावजी, अथर्व गोखले, मंदार पराडकर, चिन्मय पराडकर, जयेश पराडकर, प्रेमानंद पराडकर, मंदार हिंदळेकर, आडवली विभाग अध्यक्ष दिनेश तांडेल यासह अनेक आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राजीनामा देत माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या निर्णया सोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. पुढची दिशा उपरकर यांच्या कुडाळ येथील १८ रोजी होणाऱ्या मेळाव्यातुन स्पष्ट होणार आहे. अशी माहिती विनोद सांडव यांनी दिली.